तब्ब्ल 33 तासांनी मोकळा श्वास! प्रोपेलीन गॅस गळती आटोक्यात; मुंबई पुणे एक्सप्रेसवेची सद्यस्थिती काय?

0

गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. टँकरमधील वायू गळती रोखण्यास अपयश आल्याने पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक गेल्या 31 तासांपासून ठप्प होती. याबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली असून टँकरमधील वायू गळती रोखण्याचे काम मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे आता महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु करण्यात आली आहे. रायगड परिक्षेत्राच्या महामार्ग सुरक्षा पथकाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेसवरील आजची स्थिती काय?

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर, दिनांक ०३/०२/२०२६ रोजी १७.०० वा. चे सुमारास मुंबईकडे जाणा-या वाहिनीवर कि.मी. ४१/००० आडोशी बोगद्याजवळ प्रोपेलीन गॅस वाहतुक करणारा टॅन्कर पलटी होवून त्यामधील ज्वलनशील प्रोपेलीन गॅस गळती सुरू झाली होती. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने द्रुतगती महामार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती.

आत्ता तब्बल 33 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेने मोकळा श्वास घेतला असून वाहतूक सुरळित झाली आहे. आडोशी बोगदा जवळील अपघातग्रस्त केमिकल टँकर बाजूला घेत मुंबईकडे जाणाऱ्या तीनही लेन लेन पूर्ण क्षमतेने चालू करण्यात यंत्रणाना यश आले आहे. रात्री 2 च्या सुमारास वाहतूक पूर्वव्रत सुरु करण्यात आल्या. बाधित टँकर शेवटी एक्सप्रेस वे वरून बाहेर काढण्यात यश आले असून शीघ्र गतीने वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका करण्या सर्वच यंत्रणाच्या संयुक्त प्रयत्नांना अखेर यश आले आहे.

अधिक वाचा  पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, पुढील आठ महिन्यासाठी पालिकेचे आज कठोर निर्बंध,’या लोकांना पाणी वापरता येणार नाही…

प्रवाशांची गैरसोय होवू नये म्हणून सदर घटनेबाबत प्रसार माध्यमे तसेच सोशल मिडीयाच्या माद्यमातून याबाबत माहिती देण्यात आली होती. सदर ठिकाणी महामार्ग पोलीस, रायगड जिल्हा पोलीस दल तसेच फायरब्रिगेड, एनडीआरएफ, बीपीसीएल, हेल्प फाउंडेशन व काही केमिकल एक्सपर्ट हे घटना घडल्यापासून गॅस गळती रोखून वाहतुक सुरळित करण्यासाठी प्रयत्नशील होते.

वाहतूक सुरळीत सुरु…

पुणेकडे जाणारी वाहतुक हि दोन वाहिनीवरून सुरू ठेवण्यात आली आहे तसेच पुणे लेनवरील पहिल्या वाहिनीवरून मुंबईकडे येणारी वाहतुक सुरू ठेवण्यात आलेली आहे. दिनांक ०४/०२/२०२६ रोजी २२.०० वा. केमिकल एक्सपर्ट यांनी सदर टॅन्करमधील वायु गळती रोखण्यासाठी अजून दोन तासांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर द्रुतगती महामार्गावरील वाहतुक पुर्ववत करण्यात आली आहे. तसेच जुना मुंबई-पुणे (NH48) महामार्गावरील वाहतुक सुरळित चालू आहे.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण