बढेकर ग्रुपचा १६ वा वर्धापनदिन सोहळा भावनिक वातावरणात साजरा; ही मूल्यांची आणि संस्कारांची पावती

0

बढेकर ग्रुपच्या १६ वा वर्धापनदिनाचा सोहळा नुकताच बढेकर कार्यालयात साधेपणात पण अत्यंत भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. या खास प्रसंगी केक कापण्याचा मान श्री. प्रविण बढेकर यांचे आजोबा, श्री. फक्कडराव शंकरराव बांगर यांच्या हस्ते पार पडला.

या सोहळ्याने केवळ संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा टप्पा साजरा झाला नाही, तर पिढ्यान्‌पिढ्यांचा संस्कार, मूल्ये आणि विश्वास यांचा सन्मानही व्यक्त झाला. उपस्थित सर्वांसाठी हा क्षण अत्यंत प्रेरणादायी ठरला.

१६ वर्षांच्या प्रवासात Badhekar Group ने विश्वास, गुणवत्ता आणि जबाबदारी या मूल्यांवर आधारित कामगिरी करत अनेक कुटुंबांची घराची स्वप्ने साकार केली आहेत. या वाटचालीत मार्गदर्शकांचे आशीर्वाद, सहकाऱ्यांची मेहनत आणि हितचिंतकांचा विश्वास हेच संस्थेचे खरे बळ ठरले आहे.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

या प्रसंगी प्रविण बढेकर यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “आजोबांच्या हस्ते केक कापला जाणे हा आमच्यासाठी केवळ वर्धापनदिनाचा क्षण नाही, तर आमच्या मूल्यांची आणि संस्कारांची पावती आहे. याच बळावर पुढील काळातही अधिक प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करत राहू.” अर्थपूर्ण अशा या वर्धापनदिन सोहळ्याने बढेकर ग्रुपच्या १६ वर्षांच्या विश्वासार्ह प्रवासावर एक भावनिक शिक्का उमटवला.