रक्ताचं आणि विचाराचं दोन्ही ‘वारसदार’ आमने-सामने; राज साहेबांच्या निष्वावान वाघिणीसाठी मनसैनिकही प्रचंड उत्साही

0

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग 32 मधील रक्ताचे आणि विचारांचे दोन वारसदार एकाच गटातून आमने सामने आल्याने या प्रभागातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज साहेब ठाकरे यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या मनसैनिकांनी माजी नगरसेविका भाग्यश्री कैलास दांगट यांच्या नेतृत्वात स्वर्गीय रमेशभाऊ वांजळे यांच्या घरातील उमेदवाराच्या विरोधातच एल्गार पुकारल्याने प्रभाग 32 मध्ये सत्ताधारी भाजपा आणि निष्ठावान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमने-सामने आल्या आहेत. वारजे माळवाडीतील मनसैनिक आजही स्वर्गीय रमेशभाऊ वांजळे यांच्या विचारांचा वारसा घराघरात पोचवण्याचे काम करत असताना थेट त्यांच्याच घरातील उमेदवारा विरोधात लढण्याचा प्रसंग आला तरीही रक्त नव्हे विचार महत्त्वाचे! आज सर्वांगीण विकासाचा मार्ग पत्करत प्रचारात सक्रिय झाले आहेत.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

माजी नगरसेविका भाग्यश्रीताई कैलास दांगट यांचे मूळ गाव असलेल्या वारजे शिवणे परिसरात आजही स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांच्या आठवणी आणि काम मतदारांना प्रचारामध्ये नागरिकांच्या तोंडून कौतुकाने ऐकायला मिळत आहे. करातीलच लोकांनी स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे यांच्या निष्ठेची केलेली अवहेलना नागरिकांना फरशी आवडली नसल्याने प्रभाग 32: वारजे-पॉप्युलरनगर प्रभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निष्ठावानाचे पॅनल म्हणून जनमतासाठी घरोघरी जाणारे अधिकृत उमेदवार भाग्यश्री दांगट, केशर सोनवणे, गणेश धुमाळ, रियाज शेख नागरिकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. वारजे शिवणे परिसरामध्ये सध्या फक्त राजगादीचा विचार करणाऱ्यचं पॅनल आणि एकनिष्ठ पॅनल अशी थेट लढत रंगत आहे. जनसेवा हेच अंतिम ध्येय! हे वचन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देत असल्याने अधिकृत चिन्ह रेल्वे इंजिन नागरी प्रतिसाद विजयाकडे घौडदौड करत आहे. रक्ताच्या वारसांनी विचारांशी प्रतारणा केल्यामुळे एकनिष्ठांचा विजय करण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाले असून वाढता जनप्रतिसाद आता या प्रभागात रेल्वे इंजिन विजयी होण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

अधिक वाचा  महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न