मनसे कार्यकर्त्यांच्या कष्टाची ‘साय’खाऊ ताईचा करेक्ट कार्यक्रम; जनमतातही तीच भावना

प्रभाग 32: वारजे-पॉप्युलरनगर त्यांच्या तप्त भावना; प्रभागातही सुप्त लाट सुरू

0

वारजे शिवणे परिसरामध्ये ‘जयाचं शिर तया धडाशी सुंदर!’ या आध्यात्मिक उक्तीला (आगळी- वेगळी पक्षांतरे करून) तिलांजली देण्याचे काम भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी केल्याने ‘निष्ठा एकाची दुप्पटा दुसरा’ अशी अजब घृणास्पद परिस्थितीत एकमेव निष्ठावानंतर पॅनल परिसरामध्ये जनमताचा कौल घेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कष्टाची ‘साय’ खाऊन भाजपाकडे उडालेल्या चिऊताईचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्याचा दृढ संकल्प या निष्ठावान कार्यकर्त्यांनी मनसे केला असून जनमताचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. राजगादी फक्त आपल्याच घरात या आसुरी अपेक्षांचा नायनाट करण्यासाठी मनसैनिक रस्त्यावर उतरले असून जनप्रतिसाद ही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने निश्चिती केलेल्या निष्ठेची विष्ठा केलेल्या लोकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची सुक्त लाट प्रभागात जोपासली जात आहे.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

प्रभाग 32: वारजे-पॉप्युलरनगर प्रभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निष्ठावानाचे पॅनल म्हणून जनमतासाठी घरोघरी जाणारे अधिकृत उमेदवार भाग्यश्री दांगट, केशर सोनवणे, गणेश धुमाळ, रियाज शेख नागरिकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यातच विधानसभा विजयाचे सोनेरी स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदरी निराशा पडली असली तरी सुद्धा सर्वात मोठे दुःख म्हणजे कार्यकर्त्यांच्या कष्टाची साय खाऊन उडालेल्या चिऊताईचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न ‘मन’से सुरू झाला आहे. महाराष्ट्रात नव्याने उदयास आलेल्या शिवयुतीतील सर्वच कार्यकर्त्यांनी याबाबत गांभीर्याने प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याने प्रभागाची गणिते बदलण्यास सुरुवात झाली आहे.