प्रभाग 32: जनहितार्थ अभ्यासू विनम्र नेतृत्वाची एंट्री; राज साहेबांची ‘वाघीण’ रणांगणात सक्रिय!

0

….वारजे बदलतय! म्हणत वारजे माळवाडीच्या सर्वसामान्य नागरिकांना ‘दिवास्वप्न’ दाखवणाऱ्या संधी साधू चेहऱ्यांनी आपलं राजकीय भविष्य उज्वल करण्यासाठी सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांचे घर जाळत! केलेल्या भ्रमनिराशामुळे तप्त झालेल्या भावनांना आधार देण्यासाठी राज साहेबांची अभ्यास विनम्र ‘वाघीण’ मैदानात उतरली असून जनहितार्थ संधी साधू चेहऱ्यांचा पक्का कार्यक्रम करण्याचा संकल्प भाग्यश्री कैलास दांगट या वाघिणीने केला आहे. वारजे माळवाडी परिसराला 2012 ते 2017 या पाच वर्षाच्या काळामध्ये नेत्याच्या उंबऱ्यावर न जाता तुमच्याच दारात ‘विकास’रथ सुरू करण्याचा आणि वारजे माळवाडी च्या प्राथमिक सुविधांना प्राधान्य देण्याची केलेली कामगिरी नागरिकांना ज्ञात असल्याने या नव्या शुभारंभाला वाढता जनप्रतिसाद वारजे माळवाडी प्रभागांमध्ये धक्कादायक बदल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक वाचा  राज्यात ‘अर्णब’ चक्रीवादळामुळं पाच दिवस पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट; गडचिरोली मुसळधारेचा इशारा

भाग्यश्री दांगट यांना पुणे महापालिकेमध्ये काम करण्याची 2012 मध्ये नगरसेवक म्हणून संधी मिळाल्यानंतर परिसराचा सर्वांगीण आणि सुयोग्य पद्धतीने विकास करण्यासाठी कृतीबद्धता कायम ठेवत कैलासभाऊ आणि वहिनी यांनी कर्वेनगर– माळवाडी परिसरामध्ये एक अभ्यासू आणि प्रशासकीय जाण ठेवत विकास काम केले आहे. समाजातील गरजवंतांसाठी मदत ही जबाबदारी समजत भक्कम उभे राहणारा हक्काचा ‘जनसेवक’ म्हणून निर्माण झालेली ओळख ही भाग्यश्री दांगट यांची जगण्याची बाजू आहे. 2012 ची पुनरावृत्ती! ठेचू संधी साधू वृत्ती! या समर्पक उक्तीने प्रभागामध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 महाराष्ट्राचे झुंजार आणि पितृतुल्य व्यक्तिमत्व राज साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर असेल ती स्थिती आणि परिस्थिती गोड मानून आजपर्यंत या दांपत्याने वारजे माळवाडी परिसरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कायम एकनिष्ठ! ही जपलेली ओळख या दाम्पत्याच्या जमेच्या बाजू आहेत. वारजे माळवाडी परिसराचा विकास झाला असला तरी सुद्धा प्राथमिक रस्ते पाणी या समस्या आजही गंभीर झालेल्या असल्याने या नव्या कल्पक नेतृत्वाकडे मतदारांकडून आश्वासक पद्धतीने पाहिले जात आहे. जागाबाधीत गावकऱ्यांना योग्य मोबदला! रखडलेले जागेचे अधिग्रहण! ‘सेवा’ रस्त्यांची रखडलेली कामे! वारजे माळवाडी भागात 24×7 पाणीपुरवठा सक्षम यंत्रणा असतानाही केवळ स्वहितार्थ जगणाऱ्या नेतृत्वामुळे वारजे माळवाडी तीन लोकांना भोगावे लागणाऱ्या यातना सोडवण्याचे आश्वासन प्रचारातून दिले जात आहे.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव