आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या सुनीता गजानन तांबे कालवश

0

मुंबई दि. १ (रामदास धो. गमरे) आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते, लघु उद्योजक संतोष तांबे यांच्या मातोश्री सुनीता गजानन तांबे मु. गाव साखर, ता. खेड, जिल्हा रत्नागिरी यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले.

दिवंगत सुनीता तांबे या आदर्श माता, आदर्श कार्यकर्त्या व आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असून त्या सोज्वळ मनाच्या, हसतमुख, मनमिळाऊ, प्रेमळ व दानशूर स्वभावाच्या होत्या, त्यांच्या अंत्ययात्रेत विविध राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे, खेड १५ गाव ग्रुपमधील मान्यवर व समाजातील सर्वच स्तरातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या गोडवाणीने व समंजस स्वभावाने त्यांनी माहेर, सासर या दोन्ही परिवारांचा समनव्य सांभाळत दोन्ही परिवारांना एकसंध ठेवलं होतं. त्यांच्या मागे त्यांचे चिरंजीव संतोष तांबे, राजेश तांबे, शैलेश तांबे ही तीन मुले, तीन सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

दिवंगत सुनीता गजानन तांबे यांचा पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम रविवार दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता १०९ साई विसावा, एल एन मार्ग, माटुंगा – (पू.) मुंबई नंबर ४०००१९ रुईया कॉलेज च्या समोर व इंडियन ऑइल पेट्रोल पंप च्या मागे या त्यांच्या राहत्या घरी साखरकर भावकी आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४९ यांच्या अधिपत्याखाली गौतम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे तरी आपल्या आदर्शास साश्रु नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन साखरकर भावकी व तांबे कुटुंबीयांनी केले आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान