प्रभाग 30 अन् 32 अजित दादांच्या नव्या शिलेदारांनी वारं फिरवल ‘बालेकिल्ला’ पुन्हा ताब्यात येण्याच्या शक्यता बळावल्या

0

पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खडकवासला विधानसभा मतदारसंघातील ताकद कमी करण्यासाठी विरोधकांनी जंग पछाडले असले तरीही अजित पवार यांच्या धुरंदर रणनीतीत नव्या भिडूंच्या साथीने प्रभाग 32 व प्रभाग 30 मधील वार फिरवलं असून समाविष्ट भागातील आपला बालेकिल्ला ताब्यात मिळवण्याच्या शक्यता बळावल्या आहेत. पुणे महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये विरोधकांनी वेगळ्या ‘धाटणी’च्या चेहऱ्याला गळाला लावण्यासाठी विविध प्रकारचे यशस्वी प्रयत्न केले. राजकारणातील धुरंदर अजित पवार यांनी ही संधी ओळखत नवतरुणांची एक चांगली मोट बांधून सत्ताधारी विरोधकांचे मनसुबे उधळण्याची रणनीती आखली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रणनीतीला यश आले असून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हत्या आलेल्या सर्वेक्षणानुसार बालेकिल्ला पुन्हा ताब्यात मिळवण्याच्या आशा पल्लवीत झाल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू झाली आहे.

खडकवासला पुन्हा काबीज करण्यासाठी कसलेला पैलवान म्हणून अजित पवारांची ओळख असल्याने त्यांचे डावपेचही त्याप्रमाणेच पडले. मूळ राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्णतः वेगळेच उमेदवार देण्याची किमया करूनही प्रचारात रंगत आणण्यामध्ये अजित पवार यांना प्रभाग यश आल्याची जाणीव प्रचारामध्ये दिसत होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवा चेहरा स्वप्निल दुधाने यांची जनमतामध्ये असलेली सकारात्मक प्रतिमा लक्षात घेऊन प्रभाग 30 मधील नेतृत्वाची जबाबदारी अजित पवार यांनी त्यांच्याकडे दिली. स्वप्निल दुधाने यांनी ….गडी एकटा भारी! अशी कामगिरी केल्याने त्याच्या साथीला सुद्धा कायम जनसेवक असलेले विजय खळदकर(विश्वजीत कदम यांचे खंदे समर्थक), संगीता बराटे, निवेदिता जोशी(उच्चशिक्षित आणि सोसायटी भागामध्ये जनसंपर्क दांडगा) अशी मोट बांधून एकतर्फी निवडणुकीची भाषा करणाऱ्या विरोधकांना तगडे आव्हान निर्माण करण्याचे काम केले.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

वारजे माळवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला कुणीही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आजतगायत कायम यश मिळाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेप्रमाणे विरोधकांनी मात्र अहोरात्र प्रयत्न केल्यानंतरही यश दिसत नसल्याने प्रभाग क्रमांक 32 मध्ये राष्ट्रवादीचेच 3 भिडू आपल्या गळाला लावण्याचे काम केले; परंतु अजित पवार यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करत पुन्हा सुनियोजित बांधणी आणि स्वच्छ चारित्र्य विकासवादी भूमिका असलेल्या चेहऱ्यांना संधी देऊन एकदा तगड आव्हान देण्यासाठी नव्या शिलेदारांची निवड केली असल्याने या प्रभागातील ही गणिते बदलण्यास सुरुवात झाली.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

पुणे महापालिका निवडणूकीत प्रभाग क्रमांक 30 कर्वेनगर होम कॉलनी आणि प्रभाग क्रमांक 32 वारजे पॉप्युलरनगर या दोन प्रभागात जोरदार लढत होणार आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. दीपाली धुमाळ यांनी नगरसेवक पदाच्या कार्यकाळात पुणे महापालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता या पदावरून विविध विकास कामे, प्रकल्प उभे केले आहेत. पुणे महापालिकेची मुदत संपलेली असतानाही शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी जनसंपर्कमध्ये कोणताही खंड न ठेवता आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य दिल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी वेगळी भूमिका निर्माण झालेली आहे. वारजे माळवाडी भागातील आद्य वंदनीय नाव स्वर्गीय रामभाऊ बराटे यांचे सुपुत्र सचिन बराटे या चेहऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये संधी दिल्याने पुन्हा एकदा रामनगर भागामध्ये घड्याळाची टिकटिक सुरू झाली आणि विरोधकांचेही दाबे जणांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोसायटी भागामध्ये जनसंपर्क ही मोठी समस्या होती परंतु सत्तेच्या गणितामध्ये ‘किरण बारटक्के’ नावाचे मास्टर कार्ड अजितदादांच्या हाती लागतात त्यांनी विजयाचा डाव अशा प्रकारे सोडवला की विरोधकांना धास्ती घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

खडकवासला विधानसभा मतदारसंघावर सत्ताधारी पक्षाच्या वतीने महाभयानक हल्ले करून जम्बो प्रवेश घडवले कि, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना ही वेळ अडचणीची वाटू लागली होती. परंतु अजित पवार यांनी असे काटे फिरवले कि, ही वेळ मावळ्यांची! समर्पक चर्चा सुरू झाल्याने दोन्ही प्रभागातील विजयाची गणिते बदलण्यास मदत झाली आहे. पुणे महापालिकेचा निकाल लागल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार असले तरीसुद्धा एक बली मोठी गोष्ट घडली ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना खडकवासला बालेकिल्लामध्ये हक्काचे आणि विकासाची भूमिका असणारे तीन शिलेदार मात्र मिळाले! तिच्या जीवावर पुन्हा खडकवासल्यामध्ये पक्षाची प्रतिमा लक्षणीय राहणार यामध्ये कोणतेही शंका नाही.