डॉ. आनंद तांबेंच्या जन्मदिनी 122 बाटल्यांचे संकलन; लाडक्या बहिणी अभिष्टचिंतन सांस्कृतिक मेजवानीत मंत्रमुक्त

• समस्त ग्रामस्थ व लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम • डॉ. आनंद तांबेंच्या जन्मदिनी अजितदादा पवार यांच्यातर्फे निष्ठावान कार्यकर्ता सन्मानपत्र

0

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब व डॉ. आनंद (बंडूशेठ) तांबे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने कर्वेनगरमध्ये सामाजिक जाणिवेचे भान ठेवून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 122 बाटल्यांचे रक्तसंकलन करण्यात आले तर शेकडो महिलांच्या उपस्थितीत देशी फळझाडांचे वृक्षारोपण पार पडल्यानंतर डॉ. आनंद तांबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध गायक संजय मरळ प्रस्तुत संजय मरळ व डॉ. अनघा राजवाडे यांच्या मराठी हिंदी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात कर्वेनगर परिसरातील लाडक्या बहिणी मंत्रमुग्ध झाल्या.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप कार्याध्यक्ष प्रदीपदादा देशमुख, अक्रूरशेठ कुदळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिव नितीन धुमाळे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, महिला शहराध्यक्ष सौ प्रियाताई गदादे, ऑटो टॅक्सी बस ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे अखिल भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री डॉ. बाबा कांबळे, महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक व कला विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष अनिल धवने पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराचे वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय माणिक शेठ दुधाने, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत आप्पा बराटे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जगदीश राव दिघे, कर्वेनगर भूषण हिंदुराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद वालवडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष माननीय कुमार शेठ नानासाहेब बराटे, संभाजीराव बराटे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहराच्या कार्याध्यक्ष सौ संगीता ताई संजय बराटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर संघटक माननीय संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोथरूड विधानसभा महिला अध्यक्ष तेजलताई दुधाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष सौ मीनाताई मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष सौ अपूर्वा स्वप्निल तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोथरूड मतदारसंघ युवक अध्यक्ष मा. मोहित आबा बराटे, विठ्ठलराव बराटे, मयुरेश बराटे, किंग ऑफ किंग ग्रुप चे संस्थापक संकेत शितोळे , स्वप्निल तांबे, आदित्य बराटे , गणेश हगवणे, बंटी निलंगेकर, संतोष आंबेडे ,जय खत्री, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आनंद पाटील, मराठा महासंघाचे पदाधिकारी सुनील तोडकर ,संजय बराटे, आजिनाथ नगरे, बाजीराव मासाळ, नामदेवराव राजगुरू , भरत शेठ बुरटे पाटील पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोषजी शर्मा, पुणे शहर ऑटो रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे , सल्लागार चंद्रकांत गोडबोले, सरचिटणीस प्रदीप भालेराव, कृती समितीचे संघटक तुषार पवार , मोटर वाहन सल्लागार आरटीओ पुणे आप्पा काळभोर व वरिष्ठ मोटार वाहन सल्लागार आप्पा मोकाशी यांच्यासह कर्वेनगर परिसरातील नामांकित व्यक्ती व पुणे शहरातील रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी बाळकृष्ण नेहरकर यांच्या उपस्थितीत रिक्षा चालकांसाठीचा भव्य लकी ड्रॉ ते उद्घाटन करण्यात आले, या लकी ड्रॉ मध्ये स्मार्ट वॉच (सत्तार सवार), रिक्षा टायर (दिलीप दस,चंद्रकांत कदम), युनिफॉर्म (पोपटराव आढागळे, राजाभाऊ मारणे), ब्लूटूथ हेडफोन (गणेश गवळी) टी-शर्ट, रिक्षासाठी संपूर्ण हुड, हेडफोन, स्मार्ट वॉच, सहभागी 155 सभासदांना HSRP नंबर प्लेटचे ब्रॅकेट व मीटरचे कव्हर त्याचप्रमाणे रिक्षाचे संपूर्ण हुड वाटप करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यासाठी १ किलो चिकन किंवा अर्धा किलो मलई पनीर किंवा टी-शर्ट अशी सप्रेम भेट योजना ठेवण्यात आली होती. दर्श अमावस्या या पवित्र सणाच्या निमित्ताने पनीर वाटप व सुप्रसिद्ध गायक संजय मरळ व डॉ. अनघा राजवाडे यांच्या मराठी हिंदी गाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमात हा अभिनव उपक्रम राबवल्याने हिंगणे होम कॉलनी व कर्वेनगर परिसरातील ‘लाडक्या बहिणीं’तर्फे महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी शुभेच्छा मिळाल्या.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

गेल्या ४० वर्षांपासून वंचित, दुर्लक्षित, गोरगरिबांसाठी आणि रिक्षा चालकांच्या हक्कांसाठी अथक कार्य करणाऱ्या डॉ. आनंद तांबे यांनी पुणे शहरातील रिक्षा व्यवसायाला नवे स्थान मिळवून दिले. रिक्षा स्टँडची निर्मिती, प्रवासी रिक्षा चालक व प्रशासन यांच्यातील संबंध मजबूत करणे, तसेच दिव्यांग, अपंग, विधवा महिला, सामाजिक आणि  शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. दिल्ली येथील भव्य समारंभात CEDARBROOK UNIVERCITY USA  या विद्यापीठाकडून HONORARY DOCTORATE  हा बहुमान डॉक्टर आनंद तांबे यांना प्रदान करून त्यांच्या चाळीस वर्षातील सामाजिक कार्याची व अथक परिश्रमाची दखल घेत हा सन्मान त्यांच्या योगदानाचा व समर्पणाचा खऱ्या अर्थाने गौरव करण्यात आला. डॉ. आनंद तांबे यांचा पुण्यातील रिक्षा चालक मालकांतर्फे ‘पुणेरी पगडी’, सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष माननीय श्री सुभाष भाऊ जगताप , कार्याध्यक्ष प्रदीप दादा देशमुख कार्याध्यक्ष अक्रूर शेठ कुदळे महिला शहराध्यक्ष सौ प्रियाताई गदादे माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबासाहेब धुमाळ बाळासाहेब बराटे, चंद्रकांत आप्पा बराटे ,संभाजी बराटे, बंडाशेठ बराटे व उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

याप्रसंगी कर्वेनगर मधील ग्रामस्थ कर्वेनगर परिवर्तन आघाडीचे सर्व संस्थापक सदस्य ,यशवंतराव मोहिते कॉलेजचे माजी विद्यार्थी फ्रेंड सर्कल, किंग ऑफ किंग ग्रुप चे सर्व सदस्य, महाराष्ट्राची रणरागिणी महिला संघटनेच्या सर्व पदाधिकारी, हिंगणे होम कॉलनी विकास मंचचे सर्व सदस्य तसेच कर्वेनगर हिंगणे होम कॉलनीतील सर्व गणेश मंडळाचे , दहीहंडी उत्सव समितीचे तसेच नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी तसेच मित्र हितचिंतक ज्येष्ठ नागरिक आप्तेष्ट नातेवाईक बहुसंख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार साहेब,आनंद तांबे व शुभम तांबे अभिष्टचिंतन सोहळ्याचे संयोजक स्वप्निल तांबे व संकेत शितोळे यांनी केले होते.