कर्वेनगरच्या शिवकन्येसाठी ‘ताई आपली हक्काची’ थेट मैदानात; विजयाच्या खात्रीमुळे वरिष्ठांनीही तातडीने सुत्रे फिरवली

0

पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच अत्यंत घाई गडबडीच्या निर्णयामुळे कर्वेनगर प्रभाग 30 मधील काही जागांच्या निवडीचा फटका पक्षाला बसू नये यासाठी तातडीने पावले उचलत मैत्रीपूर्ण लढत म्हणून निष्ठावान कार्यकर्त्याच्या घरातील शिवकन्या मनिषाताई विरेश शितोळे यांची तुतारी या अधिकृत चिन्हातून उमेदवारी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाळेमुळे अगोदरच घट्ट झालेल्या या प्रभागामध्ये प्रचाराची रणनीती अशी आखण्यात आली की विजयाची गणिते जुळू लागली आहेत याची जाणीव पक्ष नेतृत्वाला झाली. वरिष्ठ पातळीवरून सूत्रे आणण्यास सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहित दादा पवार यांनी पदयात्रा यशस्वी पार पडल्यानंतर संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सकाळी आठ वाजता या शिवकन्येसाठी प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे. कर्वेनगर च्या मैदानामध्ये थेट रस्त्यावर संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे फिरणार असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मतदारांची भूमिका बदलण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

कर्वेनगर प्रभाग क्रमांक 30 मध्ये पुणे महापालिका निवडणुकीमध्ये मैदानात उतरलेल्या राजमुद्रा प्रतिष्ठानची कडवट ‘शिवकन्या’ प्रचारात सक्रिय झाल्यानंतर परिसरातील 2000 लाडक्या बहिणींनी …नाते जनसेवेचे! तुमचे आमचे सर्वांचे! असे म्हणत उमेदवारासाठी अहोरात्र प्रयत्न करण्याचा संकल्प केला; मतदारांच्या गळी विकासाची धोरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा उतरवण्यात यश आल्याने आज या प्रभागांमध्ये मनिषाताई विरेश शितोळे यांना ‘विक्रमी’ प्रतिसाद मिळत असल्याने सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये सुद्धा या उमेदवाराची पसंती वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष घातले आहे. कर्वेनगरच्या विकासाला बाजूला सारणाऱ्या मानसिकतेच्या विरोधात या परिसरातील ज्येष्ठ नागरिक लाडक्या बहिणी तरुण आणि मान्यवर एकवटले असल्याने या भूमिकेचे स्वागत करण्यासाठी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे सकाळी आठ वाजता कर्वेनगर परिसरामध्ये बाईक रॅली करणार असून घरोघरी तुतारी! ….विकासाची ….स्नेहाची आणि ….शांततेची! पोचवण्यासाठी येणार आहेत. या बाईक रॅलीचे भव्यदिव्य आयोजन करण्यासाठी परिसरातील विविध गणेश मंडळे व सोसायटीतील नागरिक यांनी पुढाकार घेतल्याने सुमारे 3000 दुचाकी या रॅली समाविष्ट करण्याचा संकल्प राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयी होण्यासाठी विशेष लक्ष घातले असून एक-एक जागा विजयी कशी होईल यासाठी रणनीती आखली आहे. उमेदवार निवडीच्या दरम्यान झालेल्या निर्णयाची गणिते पुन्हा जुळवण्यासाठी तातडीने मनीषाताई शितोळे यांना उमेदवारी देऊन धोरणात्मक निर्णय घेण्यामध्ये सुप्रियाताई सुळे यांचे मोलाचे योगदान आहे. उमेदवारी देताना दाखवलेला विश्वास सार्थकी करून मनिषाताई विरेश शितोळे यांनी प्रचारात विक्रमी आघाडी घेतली आहे. ज्या अपेक्षेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आली त्याप्रमाणे आज या उमेदवाराच्या विजयाची खात्री वाढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा यंत्रणा सक्रिय केली जात आहे. परिसरातील कार्यकर्त्यांची फौज आणि वरिष्ठ नेत्यांची रणनीती कर्वेनगर प्रभागातील गणिते जुळवण्यासाठी पूरक ठरत असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना वाटत आहे.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीसांनी 25 किलो वजन 56व्या वर्षी कसं कमी केलं? त्यांच्या फिटनेसच्या सहज सुलभ गोष्टी सर्वांना शक्य