सम्यक कोकण कला संस्थेच्या विद्यमाने चिंचघर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूंचे मोफत वाटप

0

मंडणगड दि. १४ (रामदास धो. गमरे) कलावंतचे माहेरघर असलेली मातृसंस्था सम्यक कोकण कला संस्था ही सांस्कृतिक वारसा जपत असतानाच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ही आपले अमूल्य असे योगदान देत राहते, ग्रामीण दुर्गम भागातील गरीब शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेयपयोगी वस्तू व वह्यांचे वाटप करणे, त्यांच्यातील कला साहित्यिक गुणांना वाव मिळवून देणे, नवनवीन कलावंत घडवणे, पडत्या काळात त्यांना मदत करणे, वृक्षारोपण असे अनेक उपक्रम गेली २५ वर्षे सदर संस्था राबवित आहे त्याअंतर्गत मंडणगड तालुक्यातील चिंचघर गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळा, मौजे चिंचघर, ता. मंडणगड, जिल्हा रत्नागिरी या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली मोफत शालेयपयोगी वस्तू व वह्या वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

सदर कार्यक्रमाच्या आरंभी संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे, उपाध्यक्ष मुकुंद तांबे, कार्याध्यक्ष भगवान साळवी यांनी ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमास प्रारंभ केला, शाळेचे मुख्याध्यापक शिगवण गुरुजी, पाडलेकर गुरुजी यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले, तसेच संस्थेचे सचिव नरेश शिंदे यांनी पाहुण्यांची ओळख करून देत कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उद्देश सादर केले. तद्नंतर पाहुण्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तू व वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचा संचार झाला त्यांचा निरागस व अबोल आनंद बघून अध्यक्षा प्रतीक्षा लोंढे मॅडम यांनी कोकण कला संस्था ही कलाक्षेत्रातील संस्था असून ही समाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर राहून समाजोपयोगी उपक्रम राबवतात याबद्दल त्यांचे कौतुक केले. सदर प्रसंगी संस्थेचे माजी सचिव चंद्रमनी घाडगे, चिंचघर गावचे पोलीस पाटील दिलीप पिंपळकर, दिनेश आंग्रे, समीर पडेलकर, शालेय कमिटी सदस्य, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरतेशेवटी समीर पडेलकर गुरुजींनी सम्यक कोकण संस्थेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच सदर उपक्रमास हातभार लावणाऱ्या सर्वांचे व उपस्थितीतांचे अध्यक्ष्यांच्या वतीने आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार