देशभर ‘वैष्णवी’ राजकीय बळीच? भाजप प्रदेशाध्यक्षांच्या लेकाचा प्रताप सिगारेटचे चटके, उपाशी खोलीत बंद; तब्बल 130 पॉर्न व्हिडिओज्…

0

महाराष्ट्रात वैष्णवी हगवण्याचे प्रकरण ताजे अन् महाराष्ट्रमध्ये विभिन्न राजकीय दबावांमध्ये बळी पडलेल्या महिलांची प्रलंबित प्रकरणे असतानाच भाजप प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचे अनेक न्यूड व्हिडिओज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सत्य देशातील प्रशासकीय यंत्रणा कायमच सत्ताधारी पक्षाला मदत करत असल्याने नुकतेच महाराष्ट्र मध्ये वैष्णवी हगवणे, मयुरी हगवणे-जगताप या महिलांचे आपबीती सर्व महाराष्ट्रांना माहीत आहे. त्यातच आता भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष यांच्या मुलाच्या क्रू- कृत्याची भर पडलेली आहे. यामध्ये विशेष म्हणजे या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाच्या पत्नी व पीडितेने  एकत्र तक्रार केली नंतरही त्याची दखल घेतली नाही. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षांच्या लेकाचा प्रताप समोर आला आहे. त्याचे अनेक पॉर्न व्हिडिओज् समोर आले आहेत. पॉर्न व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाचे नाव हे शुभम गुप्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

शुभम गुप्ताची पत्नी शीतल गुप्ताने आपल्याच नवऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. शीतलचं म्हणणं आहे की, शुभम तिचा मानसिक आणि शारिरीक छळ करायचा. त्याने एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर करुन एका तरुणीसोबत संबंध ठेवले होते. तो मला तरुणीचे अश्लील व्हिडिओ दाखवत होता. नवऱ्याने आपल्या मला अनेकदा त्रासही दिला होता. एवढंच नाहीतर शुभमने मला सिगारेटचे चटके दिले, एका खोलीत बंद करुन उपाशी ठेवले होते.

नवऱ्याच्या अशा वागणुकीने पीडित बायकोने पोलीस स्टेशन गाठून नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावेळी तिने आपला नवरा नेहमी धमक्या देत असल्याची तक्रारीत नोंद केली. ‘आई भाजप महिला मोर्चाची अध्यक्षा असल्याने तु माझं काहीही एक वाकडं करु शकत नाही’, असे म्हणत तो मला धमकी देत होता. अशातच याच व्हायरल व्हिडिओमागील सत्य समोर आलं आहे. व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणीने शुभमवर गंभीर आरोप केले आहेत.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

व्हायरल झालेल्या अश्लील व्हिडिओमुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. व्हिडिओत शुभम गुप्तासोबत दिसणाऱ्या तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तरुणीने आरोप केला की, शुभमनेच जाणुनबुजून हे अश्लील व्हिडिओ व्हायरल केले आहेत. त्याने माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तरुणीने केला.

130 अश्लील व्हिडिओ व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, शुभम गुप्ताचे एक दोन नाही, तर तब्बल 130 अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे बोलले जात आहे. हे व्हिडिओज् वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. त्यापैकी तुफान व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मैनपुरी येथील आहे. या प्रकरणात पोलीस खोलवर तपास करत आहेत.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन