साहित्यिक कट्टा वारजेचे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी एक दिवसीय 2 रे मराठी साहित्य संमेलन: स्वागत अध्यक्ष बाबा धुमाळ यांची माहिती

• अजितदादा चंद्रकांतदादा दोघांची जुगलबंदी रंगणार.            • मराठी अभिजीत भाषा विषयावरती संमेलन समर्पित • साहित्य उद्योग आणि समाजरत्न पुरस्कार वितरण                • वारजे साहित्य कट्ट्याचे अद्वितीय व नेत्रदीपक कार्य • ग्रंथ महोत्सव, ग्रंथ दिंडी, परिसंवाद, मुलाखत, कवी संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

0
24

१९८०च्या दशकानंतर वारजे उपनगर पुणे शहराची छोटी प्रतिकृती म्हणून उदयास आली. मोठ्या संख्येने विविध क्षेत्रांमध्ये अद्वितीय करता करणारे लेखक, कलावंत, विचारवंत वारजे परिसरामध्ये स्थायिक झाले. प्रदीप उर्फ बाबा धुमाळ मा. अध्यक्ष, शिक्षण मंडळ / नगरसेवक पुणे मनपा यांनी या उपनगराचा भौगोलिक विकास करीत सामाजिक सांस्कृतिक व कलाक्षेत्रात एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करावे या प्रमुख हेतूने वारजे साहित्य कट्ट्याची स्थापना करण्यात आली. पुणे महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समिती अंतर्गत साहित्यिक कट्टा वारजेच्या वतीने दुसरे एक दिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते रात्री १० पर्यंत डॉ. मणिभाई देसाई सभागृह, बाएफ संस्था वारजे, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी आज पत्रकार परिषदेत प्रदीप (बाबा) धुमाळ, डी. के. जोशी, शरद जतकर, सुरेश जाधव, अशोक शहा, महेश कुलकर्णी, जयंत मोहिते, चंद्रशेखर धर्माधिकारी, महादेव गायकवाड यांनी आज माहिती दिली.

वारजे उपनगरातील साहित्यिक लेखक कवी कलाकार तसेच सर्व घरातील मुलांसाठी व्यक्तीसाठी कार्यक्रम आयोजित करून या नवसाहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात साहित्यिक कट्टा वारजे यशस्वी झाला. पुणे शहराला अतिशय समृद्ध साहित्य, संस्कृती, कला व शिक्षणाचा वारसा लाभलेला आहे. वारजे साहित्यिक क‌ट्ट्याचे वतीने वर्षभर मराठी भाषा संवर्धन व प्रसार तसेच व्यक्तींच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी कट्ट्यातर्फे दरवर्षी तीन दिवसांची शब्द ब्रह्म व्याख्यानमाला, राज्यस्तरीय कथा कविता स्पर्धा, बाल चित्रपट महोत्सव, चित्र रेखाटन स्पर्धा तसेच विविध लेखन प्रशिक्षण शिबिर, अभिनय प्रशिक्षण शिबिर, कविता रसग्रहण शिबिर यांचे यशस्वी आयोजन केले जाते.

वारजे उपनगरातील विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक युवती, जेष्ठ नागरिक, नवोदित लेखक, कवी व समाजातील सर्व थरातील लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. परिणामी पुणे महानगरपालिकेने सुरू केलेल्या विविध साहित्यिक कट्ट्यामध्ये वारजे साहित्य कट्ट्याचे कार्य अद्वितीय व नेत्रदीपक आहे अशी प्रतिक्रिया विविध क्षेत्रातील तज्ञांनी, व्यक्तींनी नमूद केल्यामुळे साहित्यिक कट्टा वारजे या संस्थेस सातत्याने प्रेरणा मिळत आहे.

या संमेलनात ग्रंथ महोत्सव, ग्रंथ दिंडी, परिसंवाद, मुलाखत, कवी संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या साहित्यिक कट्ट्या तर्फे कै. रामचंद्र देखणे थोर साहित्यिक यांचे स्मरणार्थ ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली आहे. एक अतिशय आनंदाचा व प्रत्येक मराठी भाषा प्रेमिकास अभिमान वाटावा असा निर्णय नुकताच भारत सरकारने जाहीर केला आहे तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषा व संस्कृतीचा एक प्रकारे गौरवच केला आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

वारजे साहित्यिक कट्ट्याचे यशस्वी संचालन करीत असताना मला वारजे नगरातील ज्येष्ठ, श्रेष्ठ साहित्यिक कलावंत विचारवंत यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. हे मी विनम्रपणे नमूद करीत आहे. साहित्यिक कट्ट्याचे विकास प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ लेखिका व कवियत्री माननीय श्रीमती माधवीताई वैद्य यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. तसेच संस्थेचे सचिव श्री दिगंबर जोशी व सर्व सन्माननीय सदस्यांचे वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने आम्हाला प्रेरणा व उत्साह मिळत आहे. असे स्वागत अध्यक्ष श्री. प्रदीप बाबा धुमाळ यांनी यावेळी बोलताना सांगितले.

-सविस्तर कार्यक्रम पत्रिका-

पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती व साहित्यिक कट्टा वारजे आयोजित

एक दिवसीय 2 रे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० ते रात्री १० पर्यंत

स्थळ : डॉ. मणिभाई देसाई सभागृह, बाएफ संस्था वारजे, पुणे

* स्वागताध्यक्ष *

प्रदीप उर्फ बाबा धुमाळ (मा. अध्यक्ष, शिक्षण मंडळ / नगरसेवक, पुणे पुणे मनपा)

(अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला विधानसभा मतदार संघ)

* निमंत्रक

सौ. दिपाली प्रदीप धुमाळ (मा.विरोधी पक्षनेत्या, पुणे मनपा) डॉ. माधवी वैद्य (ज्येष्ठ साहित्यिका)

श्री. डी. के. जोशी (सचिव, साहित्यिक कट्टा वारजे)

* कार्यक्रमाची रूपरेषा *

रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी

सकाळी : ९.३० वा

ग्रंथदिंडी शुभारंभ (बाएफ संस्था मुख्य प्रवेशद्वार ते सभागृह)

शुभहस्ते : ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे (शिवचरित्रकार)

सकाळी : १०.०० वा

चित्र प्रदर्शन उद्घाटन शुभहस्ते : मा. रूपेश पवार

(प्रसिध्द चित्रकार, उपप्राचार्य, भा.वि.कॉ. ऑफ फा. आर्टस्)

सकाळी : १०.३० वा.

ग्रंथमहोत्सव उद्घाटन शुभहस्ते : मा. श्री. शंकर मांडेकर (आमदार, भोर-वेल्हा-मुळशी)

।। संमेलन उ‌द्घाटन समारंभ ।।

* पुरस्कार वितरण पुरस्कार प्राप्त सभासद सन्मान

* लेखकांचे पुस्तक प्रकाशन समारंभ

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

* स्मरणिका प्रकाशन समारंभ

संमेलन उद्घाटक

मा.ना. अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) पालकमंत्री पुणे जिल्हा

* पुरस्कार प्रदान शुभहस्ते

मा.ना. चंद्रकांतदादा पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) संपर्क मंत्री पुणे जिल्हा

प्रमुख उपस्थिती

मा.सौ. रूपालीताई चाकणकर (अध्यक्षा, महिला आयोग महा. राज्य) संमेलनाध्यक्ष मा.डॉ. सदानंदजी मोरे (ज्येष्ठ साहित्यिक)

मा. श्री. भिमराव तापकीर (आमदार, खडकवासला मतदार संघ)  मा.श्री. दिपक मानकर (शहराध्यक्ष, रा.कॉ. पार्टी, पुणे)

मा.श्री. प्रदिप देशमुख (कार्याध्यक्ष, रा. का. पार्टी, पुणे)        मा.श्री. दिलीप बराटे (अध्यक्ष, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान)

मा.डॉ. राजेंद्र भोसले (आयुक्त, पुणे मनपा)    मा.श्री. भरत काकडे (अध्यक्ष, बाएफ संस्था)

उद्योगरत्न पुरस्कार मा.श्री. संजय भोर

साहित्यरत्न पुरस्कार मा.श्री. राजीव तांबे

समाजरत्न पुरस्कार मा.श्री. सतिशभाऊ बोडके

(मा. उपसरपंच वारजे)

दुपारी : १ ते २ वा

व्याख्यान डॉ. संजय उपाध्ये (विषय-मातृभाषा व मनशांती)

दुपारी : ३ ते ४ वा

प्रकट मुलाखत

सहभाग : मा. मृणाल देव कुलकर्णी (सुप्रसिध्द अभिनेत्री)

मुलाखतकार : वि.दा. पिंगळे (कार्यवाह, म.सा.प. पुणे)

दुपारी : ४ ते ६ वा

परिसंवाद विषय : अभिजात मराठी भाषेसमोरील आव्हाने

अध्यक्षा डॉ. मंगला गोडबोले प्रमुख वक्ते : प्रा. मिलिंद जोशी व संजय आवटे

सायंकाळी ६ ते ७ वा

मान्यवरांचे कविसंमेलन

अध्यक्ष : म. भा. चव्हाण (सुप्रसिध्द कवी व गझलकार)

सुत्रसंचालन : चंद्रशेखर धर्माधिकारी

मान्यवर कवी : ज्योत्स्ना चांदगुडे, संदिप अवचट, दिगंबर जोशी, स्वाती यादव, वैशाली माळी, ऋचा कर्वे, डॉ. मंदार खरे, योगेश काळे, उमा व्यास, स्मिता जोहरे जोशी, अशोक शहा, नंदकुमार बोधाई, साधना कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर, राजेंद्र वाघ, किसन म्हसे.

सायंकाळी : ७ ते ९ वा ‘सांजधारा’ सांस्कृतिक कार्यक्रम

स्वर संगीत वारजे प्रस्तुत “सांजधारा” सुमधुर मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम सादरकर्ते : सौ. संगिता कुलकर्णी, श्री. अजय दाते, श्री. दिपक पाटील व सहकारी

संयोजक समिती

ज्योत्स्ना चांदगुडे, वि.दा. पिंगळे, गोपाळ कुलकर्णी, उदय कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, महेश कुलकर्णी, शरद जतकर, साधना कुलकर्णी, निवृत्ती येनपुरे, जयंत मोहिते, सुरेश जाधव, अशोक शहा, मानसी नलावडे, महादेव गायकवाड, नंदकिशोर बोधाई, अतुल घटवाई, अरूण पाटील.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

संयोजन समिती

अनिल गायकवाड, शिवाजी भोईन, राजेंद्र ढोबळे, ज्ञानेश्वर हांडे, दिवाकर पोफळे, राजु धोत्रे, पांडुरंग पाटील, ज्ञानेश्वर मारणे, संजय पवार, कैलास बारवे, धनंजय म्हसे, सुरेश काळे, अरूण पाटील, मनिष धुमाळ, मोहित वेलाणी, सुरेश गोपाळघरे, विजय नावंदर, मनोज बराटे, डॉ. ऋषिकेश गार्डी, संदिप पवार सर, अशोक अडुळकर, अलम पठाण, विजय खिलारे, विश्वास जाधव, माणिक लवांडे, अंकुश भगत, रमेश व्यास, राजु ताकवले, विठ्ठल पासलकर, दिपक बागुल, संतोष बोडके, संपत पवार, तानाजी शिंदे, मनिष नलावडे, बबन वाघद्रे, नंदकिशोर बडदे, संतोष देशमुख, समिर मरकळे, सुनिल देशमुख, चंद्रकांत कोंडेकर, समिर तिखे, विष्णु कुंभार, वसंत कुल, किशोर तटकरे, किसन म्हसे, गुलाब सुर्यवंशी, देवेंद सुर्यवंशी, नितीन पाटील, संजय हिंगे, संतोष घोसाळे, नितीन उरिट, शंकर (पप्पू) बोडके, दिलीप नाईक, दिलीप पोकळे, दिलीप सातपुते, कमलाकर गलांडे, नवनाथ गुंडाळ, निलेश धानापुने, संतोष वन्हाडे, विशाल सोत्रीस, भोलाशेठ बराटे, राजकुमार शिंदे, चंद्रकांत पंडित, रामभाऊ बराटे, पोपट हिमगुडे, अनिल शंकर कुलकर्णी, बाळासाहेब पानसे, चंद्रशेखर लंगडे, दत्तात्रय पायगुडे, अगय्या जक्कन, तुफेल शेख, विवेक धुमाळे, वसंत पाटील, अजित कुलकर्णी, सुनिल क्षिरसागर, श्रीकांत ठुसे, सुहास शिद्धिकर, सोमकांत ओडारकर, निलम डोळसकर, भावना पाटील, शांता नेवसे, सविता साष्ठे, प्रभावती कानगुडे, प्रतिक्षा हांडे, नेहा धुमाळ, सविता मिरेकर, वैशाली बनकर, हेमलता देशमुख, धनश्री कानेगांवकर, श्रीमती आशा डोके, श्रीमती अंजली देशपांडे, दया देशपांडे व राजयोग प्रतिष्ठान, श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ, सम्राट मित्र मंडळ,

आझाद हिंद मित्र मंडळ, राजयोग भजनी मंडळ, मराठा वॉरिअर्स, वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठान, वारजे हायवे परिसर ज्येष्ठ नागरिक संघ, ज्येष्ठ नागरिक सामाजिक प्रतिष्ठान, वारजे माळवाडी ज्येष्ठ नागरिक संघ, श्री पावश्या गणपती ज्येष्ठ नागरिक संघ प्रभाग क्र. ३१ व ३२ मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.

* निमंत्रक *

सौ. दिपाली प्रदीप धुमाळ (विरोधी पक्षनेत्या, पुणे मनपा)

* स्वागताध्यक्ष*

प्रदीप उर्फ बाबा धुमाळ (मा. अध्यक्ष, शिक्षण मंडळ/नगरसेवक, पुणे मनपा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ख.वि.म.संघ)