सर्वसामान्य लोकांशी जुळलेली नाळ आणि प्रखर हिंदुत्ववादी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारधारेची पक्की बांधिलकी झाली की राजकारणाच्या पलीकडे जाऊन वैचारिक आणि सामाजिक जाणिवेचे झालेले भान नेतृत्वाला एक अनोखा पैलू पाडून जातात आणि हीच स्थिती असते ती युवा नेतृत्वाचं परिवर्तित ‘लोकनेत्या’मध्ये झालेलं स्थित्यंतर. कोथरूड- बावधन प्रभागांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय नगरसेवक म्हणून किरण किरण दगडेपाटील यांच्या कार्य आरंभ झाला अन् अवघ्या पाच ते सहा वर्षांमध्ये नेतृत्वांच्या गुणामुळे प्रभागातील सर्वसामान्य, उपेक्षित लोकांसाठी दिवस-रात्र धावपळ करत किरण दगडेपाटील यांनी ‘आधुनिक श्रावणबाळ’ हे लोकनेतृत्त्वाचं स्थितंतरही लीलया पार केलं आहे. आज याच सेवाभावी पाटीलकी जगणाऱ्या किरणदादांचा वाढदिवस सुद्धा सेवाभावी वृत्तीने उतराई होण्यासाठी साजरा केला जात आहे.
कोथरूड भागामध्ये प्रथम नगरसेवक पदाची संधी मिळाल्यापासून सर्वसामान्य लोकांच्या आणि सुशिक्षित लोकांच्या समस्या सोडवण्यास आयुष्याला अर्पित केल्यानंतर या नेतृत्वाच्या पाठीमागे आज असंख्य मोठा जनसमुदाय उभा राहिला असून त्यांच्या दुवा आणि शुभेच्छा यांच्यावर आज त्यांच्या पाठीमागे ‘आधुनिक श्रावणबाळ’ही बिरुदावली अभिमानाने उच्चारावी वाटते. आज कोथरूड बावधन भागात हा ‘सेवाभावी पाटील’ दिवसभर ऋषितुल्य मातृत्व आणि पितृत्वांच्या शुभेच्छामध्ये ओला चिंब झाल्याशिवाय राहणार नाही. राजकीय नेत्तृत्व म्हटलं की आरोप-प्रत्यारोप हे होत राहतात पण यावरही मात करत आपल्या भागाचा विकास करण्याची कला ज्या लोकप्रतिनिधीला अवगत होते त्याच लोकप्रतिनिधी च्या पाठीमागे हा जनसागर आणि शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळत असतो. कोथरूड बावधन सुतारवाडी आणि कोथरूड डेपो परिसर या भागात लावण्यात आलेल्या शुभेच्छांच्या फलकामुळे केलेल्या कामाची पावती मिळते.
युवा नेतृत्व उदयाला येत असताना कलागुणांमुळे दिवसेंदिवस प्रगती होत विविध पदे पादक्रांत होतच जातात. पुणे महापालिकेत नगरसेवकपदी नियुक्ती झाल्यानंतर बीडीपी समितीवर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली. या समितीत काम करताना पुणे शहरातील जैविक समृद्धी आणि संपन्नता याची पुस्तिका प्रकाशित करून सामान्य लोकांना दर्शन केले. त्यानंतर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा या तरुणांच्या संघटन कार्यासाठी जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, पुणे जिल्हा हे पद घेऊन आजही युवा मोर्चाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने मानाची समजली जाणारी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. आरोप आणि प्रत्यारोप होतच राहणार पण जन्मदिवस हा खास असतो म्हणूनच…. श्री. किरणदादा दगडे पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!