पुण्यात CNG भरताना धक्कादायक घटना! यामुळे कर्मचाऱ्याचा डोळा कायमचा निकामी

0

सीएनजी (CNG) पंपावर दुचाकीला गॅस भरताना एका कर्मचाऱ्याचा मोठा अपघात झाला आहे. c ही घटना पुण्यातील तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

कसा घडला अपघात?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षद गणेश गेहलोत (रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) हे तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर काम करतात. रविवारी सायंकाळी ते एका दुचाकीला गॅस भरत असताना अचानक गॅसचे नोझल सुटून थेट त्यांच्या चेहऱ्यावर आदळले. या घटनेत त्यांचा डावा डोळा गंभीर जखमी झाला आणि तो कायमचा गेला.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

घटनेनंतर लगेचच हर्षद यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांच्या डोळ्याचे नुकसान झाल्याचे सांगितले. सध्या हर्षद यांची प्रकृती स्थिर असली तरी डोळ्याच्या दुखापतीमुळे ते मोठ्या संकटात सापडले आहेत.

पंप मालकांविरोधात गुन्हा दाखल

या घटनेनंतर सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पंप मालक धैर्यशील पानसरे आणि राहित हरकुर्ली यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे. पोलीस हवालदार संदीप चव्हाण हे तपासाचे काम करत आहेत. पोलिसांनी सुरुवातीच्या चौकशीत गॅस भरण्याच्या वेळी सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते की नाही, याची तपासणी सुरू केली आहे.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

गॅस पंप सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेमुळे सीएनजी पंपांवरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गॅस भरण्याच्या प्रक्रियेत थोड्याशा निष्काळजीपणामुळे कर्मचारी किंवा ग्राहकांना मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सीएनजी पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेच्या अत्याधुनिक साधनांचा वापर करणे गरजेचे आहे.

विशेषतः गॅसचे नोझल आणि इतर उपकरणांची नियमित तपासणी करणे, यंत्रणांची गुणवत्ता आणि देखभाल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सीएनजी पंपावर सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास अशा घटना वारंवार घडण्याची शक्यता आहे.

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या अपघातानंतर काही वेळातच घटनास्थळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये गॅस भरण्याच्या वेळी अचानक नोझल सुटून कसा कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर आदळला हे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित पंप प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.

अधिक वाचा  वारं फिरलं, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची धुव्वादार बॅटिंग, IMD चा अलर्ट; विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत