…वारकरी आणि विठ्ठलाचं नातं काय असतं! तो कधी विठ्ठलाकडे मागत नाही आणि तो सुद्धा त्याला कधीच कमी पडू देत नाही! अगदी असंच नातं उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर आनंद उर्फ बंडूशेठ तांबे अन अजित दादा याचं! कर्वेनगरच्या या अशाच भागामध्ये हा वारकरी समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कायम जनसेवेचा वसा घेऊन पक्षाचा झेंडा घरोघरी पोहोचवण्याचं काम करत आहे. 24X7 आणि 365 दिवस एकच व्रत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार आणि सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अर्पित आयुष्य! पक्षनिष्ठेच उचित फळ कदाचित आजपर्यंत मिळाल नसेल परंतु आपल्या या निष्ठावान कार्यकर्त्यासाठी त्यांचा अजित दादा हा कायमच काळ्यारात्रीही कडेवरती हात ठेवून उभा राहतो!
भारतरत्न डॉक्टर महर्षी कर्वे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आनंद उर्फ बंडू तांबे हे गेली 35 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्या विचारांना वाहून कार्यरत आहेत. यादरम्यान असंख्य निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विधानसभा लोकसभा पण आपल्या पक्षाशी निष्ठ राहत कार्यरत राहणार हेच या निष्ठावान कार्यकर्त्याला ज्ञात! त्या विठ्ठलाची जेवढी जागा वारकऱ्यांच्या आयुष्यात तेवढीच याही कार्यकर्त्याच्या मनात पक्ष नेतृत्व अन् पक्षाचा आदेश. गेली तीन दशके आनंद उर्फ बंडू तांबे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पक्ष नेतृत्वाकडे संधीची मागणी केली प्रसंगी वादविवाद झाले परंतु आपले निष्ठा न ढळता पदरी निरशा असतानाही पक्षनिष्ठांमध्ये पक्ष कार्यामध्ये कधीही दुरावा न आणला अगदी वारकरी विठ्ठलाप्रमाणेच! अशा पक्षनिष्ठ अविरत सेवार्थ नेतृत्वास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
आदरणीय अजित दादा पवार खासदार व केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ आमदार सुनील टिंगरे आमदार चेतन तुपे पाटील दीपक भाऊ मानकर प्रशांत दादा जगताप अंकुश अण्णा काकडे बंडूशेठ केमसे रवींद्र अण्णा माळवदकर दिलीप भाऊ बराटे बाबा धुमाळ आप्पा रेणुसे बाळासाहेब बोडके या सर्वांचे राजकीय दृष्ट्या सतत मार्गदर्शन लाभले. तसेच स्थानिक पातळीवर जीवाभावाचे सहकारी म्हणून शंकर अण्णा बराटे किर्तन केसरी ह.भ.प चंद्रकांत महाराज वांजळे बाळासाहेब बराटे, पोपटभाऊ बराटे, कुमार भाऊ बराटे माणिकशेठ दुधाने, चंद्रकांत आप्पा बराटे, संतोष बराटे, संगीता बराटे, पोपट अण्णा फेंगसे, शिवाजीराव फेंगसे, संजय चव्हाण, पिंटूशेठ पिंगळे, नामदेव राजगुरू, दशरथ थोरात, सोपान गोरे महाराज, मधुकर वाबळे अण्णा पुजारी, शहाजी नलगे, प्रशांत सणस, राजू चव्हाण, राजू गाडेकर, मीनाताई मोरे, रजनी पाचंगे, मंदाकिनी वनसाळे, वैशाली दिघे यांचेही मोलाचे सहकार्य लाभत केले. आनंद उर्फ बंडूशेठ तांबे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्या 64 व्या (हिरक महोत्सवी पर्व) वाढदिवसानिमित्तही
भव्य रक्तदान शिबीर….
१) वृक्षारोपण
२) दिव्यांग आश्रमात धान्य वाटप
३) वृद्धाश्रमात शिधा वाटप
४) रिक्षा चालकांसाठी युनिफॉर्म वाटप
५) टी शर्ट वाटप
६) मिटर कव्हर वाटप
७) रिक्षाचे संपूर्ण हुड वाटप
८) १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा असे विविध कार्यक्रम बुधवार दि. २४/०७/२०२४ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता हिंगणे होम कॉलनी सभागृह, कर्वेनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानची ही ‘सेवा दिंडी’ शी आज पॉप्युलर, गिरिधर नगर, अतुल नगर, शिवकल्याण (सुतारदरा), भेलकेनगर, कर्वेनगर यासह कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर आनंद उर्फ बंडूशेठ तांबे काम करत आहेत. यात प्रामुख्याने श्री चंदन अटक, विजय पोळराजेंद्र मारणे, राजेंद्र कडू, राजेंद्र चव्हाण, राजाभाऊ भोंडवे, अमित कोंढाळकर, रघुनाथ पारखी, गणपत जोरी, संभाजी आंबेकर, स्वामी उत्तरेश्वर, अनिल उर्फ बंडू चव्हाण, विष्णू भुरटे, सुनील भोसले, गजानन मानकर, नाना मोकर, प्रमोद मोरे, संतोष शिंदे, संतोष तनपुरे, लक्ष्मण चांदणे,दत्ता कोळेकर, मंदार गायकवाड, महेश कवडे, दिलीप धस, विनायक तोंडे इत्यादी प्रमुख शिलेदार याच ‘सेवा दिंडी’च्या सेवार्थ कार्यरत आहेत.
रिक्षा चालक मालकांचे कुटुंबीयांचे भविष्य उज्वल करण्यासाठी समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे भरभक्कम संघटन उभं करून कल्याणकारी महामंडळ कार्यरत करणे, स्वस्त घरकुल योजना, रिक्षा चालकांना पेन्शन चालू करणे. यासह मुलांसाठी शिक्षणाची सोय, औषधोपचार, समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानने कटिबद्धता बांधील केली असून समर्थ सेवा रिक्षा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री आनंद उर्फ बंडू शेठ तांबे हे ही कायम कार्यरत आहेत. रिक्षा चालकांचा हा प्रतिनिधी भक्कमपणे उभे राहत आजही आपल्या विठ्ठलांशी हक्काने भांडत आहे.