बिग बी अन् प्रभास प्रथम स्क्रीन शेअर; ओपनिंग पूर्वीच ‘कल्की 2898 एडी’ वर पैशांचा पाऊस; बुकिंग साइट क्रॅश

0

अमिताभ बच्चन आणि प्रभास यांचा कल्की 2898 एडी ची दररोज बंपर ॲडव्हान्स बुकिंग होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून एक दिवस बाकी असताना कल्कीला केवळ भारतातच नव्हे तर जगभरातून आगाऊ बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इतकेच नाही तर प्रभासच्या चित्रपटाचा पहिला शो तेलंगणामध्ये रिलीजच्या पहिले आठ दिवस सकाळी 5.30 वाजल्यापासून सुरू होणार आहेत. आत्तापर्यंत या चित्रपटाची भारतात आगाऊ बुकिंगद्वारे तीन लाख तिकिटे विकली गेली आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे कल्की 2898 एडी ही ओपनिंगच्या बाबतीत बाहुबली आणि आरआरआरला मागे टाकू शकते अशीही चर्चा आहे.

अधिक वाचा  भाजपाचे पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी पुण्यावर विशेष लक्ष; कारवाईच्या भीतीने नगरसेवकांचा मतदारांशी संपर्क?

कल्की 2898 एडी मध्ये शतकातील मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत साउथ सुपरस्टार प्रभास हा पहिल्यांदा स्क्रीन शेअर करत आहे. या जोडीसोबत दीपिका पदुकोणही कल्की मध्ये झळकत आहे. या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू झाले आहे. येत्या 27 जून रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. कल्की 2898 AD संपूर्ण भारतात 120-140 कोटी रुपयांमध्ये तर जगभरात 200 कोटींची ओपनिंग करेल असे अनेक ट्रेड ॲनालिस्ट्सचे मत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तेलगू राज्यांमध्ये हा चित्रपट 90 ते 100 कोटींची कमाई करेल. तर, उत्तर भारतात कल्की 2898 एडी 20 कोटी रुपये कमावेल. कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये हा चित्रपट 15 कोटींहून अधिक कमाई करू शकतो असा अंदाज आहे.

अधिक वाचा  वारं फिरलं, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची धुव्वादार बॅटिंग, IMD चा अलर्ट; विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

बुकिंग साइट क्रॅश झाली

अनेक राज्यांमध्ये कल्की 2898 एडी च्या आगाऊ बुकिंगची मागणी प्रचंड वाढली आहे. बुक माय शो या साईटवरून तिकीट बुकिंगवर ताण पडल्याने ही वेबसाइट क्रॅश झाली. विशेषता दक्षिणेकडील राज्यांमध्ये ही क्रॅश झाली आहे. त्यामुळे आगाऊ बुकिंगमध्ये या सायन्स फिक्शन चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. तेलुगुमध्ये (3D, 2D आणि IMAX 3D) कल्कीने 7.7 कोटी रुपये कमावले आहेत. हिंदीमध्ये 1738 शोसाठी 13,833 तिकिटे विकली गेली आहेत. यातून 43.6 लाख रुपये कमावले आहेत. तर, तामिळ (3D, 2D) मध्ये 278 शोसाठी 2925 तिकिटे विकून 5.12 लाख रुपये कमावले आहेत.

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी