महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, गोविंदा, करिना कपूर, करिष्मा कपूर शिंदे गटात प्रवेश करणार, काँग्रेसचाही बडा नेता शिवसेनेच्या गळाला

0
1

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात आज दिग्गजांचे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अभिनेत्री करिना कपूर, अभिनेत्री करिष्मा कपूर, अभिनेता गोविंदा यांचा आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील काँग्रेसचा आणखी एक बडा नेते हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम हे देखील आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री याबाबत उल्लेख करणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा हिरोला उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोविंदा याआधी काँग्रेस पक्षाचा खासदार देखील राहिला आहे. तो लोकसभा निवडणूक याआधी निवडून आला आहे. त्यानंतर तो आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असून त्याला मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अभिनेत्री करिष्मा कपूर आणि करिना कपूर या दोन्ही बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जावून भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांचादेखील पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

गोविंदाला उमेदवारी मिळाल्यास जिंकून येणार?

शिवसेना शिंदे गटाकडून नुकतंच काल स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये एकूण 40 नेत्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी ही यादी जाहीर करण्यात आली आहे. आता या स्टार प्रचारकांमध्ये बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री देखील असतील का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिनेकलाकारांवर नागरीक खूप मनापासून प्रेम करतात. त्यांच्या कामावर लोक प्रेम करतात. त्यामुळे त्याचा फायदा राजकारणात देखील होऊ शकतो. गोविंदा हिरो प्रेक्षकांच्या प्रेमामुळे याआधी खासदार म्हणूनही निवडून आलाय. त्यामुळे आता पुन्हा प्रेक्षक त्याला उमेदवारी मिळाली तर लोकसभेला पाठवतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!