राज ठाकरेंचही ठरलंय! हा फॉर्म्युला? ४ दिवसांत दुसऱ्यांदा दिल्ली दौरा! आज रात्री बैठक फडणवीसही अतीआग्रही!

0

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. चार दिवसांत राज ठाकरेंचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीतच आहेत. यामुळे राज ठाकरेंचा महायुतीत प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंबद्दल राजकीय वर्तुळातून ते महायुतीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान प्राप्त माहितीनुसार आज रात्री महायुतीची बैठक दिल्लीत होणार असून त्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन जागांवर आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यापैकी एक जागा दक्षिण मुंबई मतदारसंघ असल्याचं बोललं जात आहे. तर मनसेला जरी दोन लोकसभेला जागा न दिल्यास एक जणांना राज्यसभेची उमेदवारी भाजपकडून देण्याची शक्यता तसेच विधानसभेत पण समाधानकारक जागा देण्याचे सुद्धा आश्वासन भाजप देऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक असणार असल्याचं दिसत आहे.