मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टँकरला आग; दोघांचा होरपळून मृत्यू, वाहतूक ठप्प

0

या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या रस्त्यावरही केमिकल सांडल्याने रस्त्यावरील गाड्यांनाही आग लागली आहे, अशी माहिती समोर येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन जाणारा ऑईल टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी आला. त्यामुळे आग जास्त भडकल्याची माहिती मिळत आहे.

टँकरला आग लागल्यानंतर मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरही मोठ्या प्रमाणावर ऑईल पसरलं आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर एका टँकरला आग लागली आहे. यात चौघे जण होरपळल्याची माहिती समोर येत आहे. बोरघाटात एका पुलावर हा प्रकार घडला आहे. त्यातील एक महिला खालून जाणाऱ्या रस्त्यावर पडली. काही वेळापूर्वीच ही घटना घडली आहे. दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात अली आहे.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

नेमकं काय घडलं?

केमिकल घेऊन भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला, यामुळं टँकर स्लिप झाला, या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला. मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले, खालून जाणाऱ्या मार्गावर ही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली. खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले. यात ते होरपळले. तर टँकरमधील आगीत होरपळले.

नेमकं काय घडलं?

केमिकल घेऊन भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला, यामुळं टँकर स्लिप झाला, या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला. मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले, खालून जाणाऱ्या मार्गावर ही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली. खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले. मागील एका तासापासून या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ब्रीज खालच्या गाड्यांना पण आग लागली आहे, अशी माहिती मिळत आहे. या टँकरची आग विझावण्यासाठी फायर ब्रिगेडला फोमच्या गाडीची आवश्यकता आहे. मात्र सध्या IRB यंत्रणा पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. काही किरकोळ जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

ब्रिजच्या खालच्या गाड्याही जळून खाक

ब्रिजवरील ऑईल टँकरला भीषण आग लागल्याने ब्रिजच्या खालीदेखील या आगीच्या झळा पोहचत आहेत. त्यासोबतच ब्रिजच्या खालच्या दोन ते तीन गाड्यांना देखील आग लागली आहे. ऑईल टँकरला आग लागल्याने स्फोट होण्याची भीती अग्निशमन दलाचे जवान व्यक्त करत आहे. असं असलं तरी मागील तासाभरापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरु असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पावसाने हजेरी लावल्याने आग आटोक्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुलावरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक हळूहळू सोडण्यात येत आहे. मात्र, मुंबई दिशेने येणारी वाहतूक अजूनही बंदच ठेवण्यात आली आहे.

अधिक वाचा  नागपूर पदवीधर ६४.७६ टक्के मतदान वर्धा, गडचिरोलीत सर्वाधिक प्रतिसाद; नागपूरमध्ये निरुत्साहच टक्केवारीही घटली