सध्याच्या परिस्थितीत आनंदराज आंबेडकरच समाजाला दिशा देऊ शकतात – उत्तमराव खोब्रागडे

0

मुंबई दि. ३ (रामदास धो. गमरे) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांचे नातू तसेच भैय्यासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या नेतृत्वगुण व कौशल्याच्या जोरावर इंदू मिल ताब्यात घेतली त्यावर न थांबता पुढे जाऊन बौद्धजन पंचायत समिती व पीपल्स एज्युकेशन सोसायटी ताब्यात घेतली व आपण केवळ रक्ताचे वारसदार नसून बाबासाहेबांच्या विचारांचे ही वारसदार आहोत हे पदोपदी सिद्ध केले व एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे म्हणून सध्याच्या परिस्थितीत समाजाला दिशा देऊ शकतात असे माझे प्रांजळ मत आहे” असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचे माजी जिल्हाधिकारी मा. उत्तमराव खोब्रागडे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता या नात्याने केले.

रिपब्लिकन सेना महाराष्ट्र, बौद्धजन पंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समिती गठीत करण्यात आली त्या सत्कार समितीचे अध्यक्ष यशवंत भैय्यासाहेब भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली इंदू मिलचे प्रणेते, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचा वाढदिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे मोठ्या थाटामाटात व जोशजल्लोष, उत्साहात संपन्न झाला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

सदर प्रसंगी संस्कार समितीचे अध्यक्ष मंगेश पवार व सरचिटणीस मनोहर बा. मोरे यांनी धार्मिक पूजाविधी लाघवी व गोडवाणीने संपन्न केला, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत व विनोद काळे यांनी आपल्या प्रभावी व ओजस्वी भाषाशैलीत केले. सदर वाढदिवसाचे औचित्य साधून सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने गीतगायनाचा सुरेल कार्यक्रम सादर केला सोबतच महाराष्ट्रभर विविध रुग्णालयात रुग्णांना फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम करून कार्यकर्त्यांनी सदर वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासली, तसेच पदवीधर अर्पिता गणेश चित्ते हिने ९३.४०% व सिमरन प्रकाश मोरे हिने ९१% गुण मिळवल्याबद्दल तसेच सरपंच सुधीर परशुराम साळवी यांना आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन याठिकाणी वाढदिवसानिमित्त आनंदराज आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी मनिषाताई आंबेडकर, युवानेते ऍड. अमन दादा आंबेडकर आणि त्यांचे सासरे पांडुरंग साळवी, उपसभापती विनोद मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

सदर प्रसंगी संजीव बौधनकर, केंद्रीय सचिव ऍड. संघराज रुपवते, केंद्रीय प्रवक्ते निवृत्त समाजकल्याण सचिव दिनेश डिंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच भारतीय बौद्ध महासभेचे एच. के. भंडारी, बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, सरचिटणीस राजेश घाडगे, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, काकासाहेब खंबाळकर, युवराज धसवाडीकर, विनोद काळे, गजानन तांबे, प्रकाशभाऊ खंडागळे, बाबासाहेब गायकवाड, आशिष गाडे, अमोल रोकडे, माधवदादा जमदाडे, वसंत कांबळे, संजय देखणे, प्रा. राजू सोनसाळे, योगेंद्र चौरे, युवराज बनसोडे, किरण घोंगडे, आशिष गाडे, अमोल रोकडे, नितीन बनसोडे, श्रीपती ढोले, काकासाहेब गायकवाड, भगवान साळवी, राजेश शिनगारे, गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, दर्शन जाधव, मंगेश जाधव, भाई जोशी, प्रकाश भाऊ खंडागळे, डॉ सुशीलकुमार सुर्यवंशी, भगवान साळवी, लवेश लोखंडे, विरेंद्र लगाडे, भय्यासाहेब भालेराव, संतोष पवार, डॉ. सुशीलकुमार सुर्यवंशी, प्रा. सुनील वाकेकर, दिनेश आदमाने, मध्यवर्ती कार्यकारिणी, विश्वस्त मंडळ, महिला मंडळ यांनी आनंदराज आंबेडकरांचे भरभरून कौतुक करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्वांचे हे प्रेम बघून आनंदराज आंबेडकर भावुक झाले त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. सरतेशेवटी विनोद काळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा