महाराष्ट्रातील लाडके गायक भार्गवदास जाधव यांच्या पत्नी जयश्री उर्फ भारती जाधव कालवश

0

मुंबई दि. १९ (रामदास धो. गमरे) सम्यक कोकण कला संस्था, महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक सदस्य तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष महाराष्ट्राचे लाडके गायक, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ४३९ घणसोली या शाखेचे अध्यक्ष, बौद्धजन सेवा संघ नायशी, मुंबई शाखेचे अध्यक्ष, नायशी गावचे सुपुत्र मा. भार्गवदास जाधव यांच्या सुविद्य पत्नी सौ. जयश्री उर्फ भारती भार्गवदास जाधव (नाईस्कर) मुक्काम गाव नायशी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

कालकथित जयश्री उर्फ भारती भार्गवदास या सोज्वळ मनाच्या, हसतमुख, सर्वसमावेशक, मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या त्यांच्या अंत्ययात्रेत समाजातील सर्वच थरातील मान्यवर तसेच सम्यक कोकण कला संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कलावंत, चिपळूण तालुका बौद्ध हितसंरक्षण समिती या समितीची संपूर्ण कार्यकारिणी, विविध पक्षातील, सामाजिक, राजकीय, कला संघटनांचे विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांच्या अचानक जाण्याने समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यामागे त्यांचे पती भार्गवदास जाधव, दोन मुली, दोन जावई, पुतणे, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

अधिक वाचा  भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या स्थितीत! राजकीय भूकंपही शक्य? एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा

दिवंगत जयश्री उर्फ भारती भार्गवदास जाधव यांचा जलदानविधी, पुण्यानुमोदन व शोकसभेचा कार्यक्रम रविवार दि. २३ मार्च २०२५ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता पंचवटी को. ऑप. हौसिंग सोसायटी, सेक्टर ५, घणसोली, नवी मुंबई येथे शाखा क्र. ४३९ चे उपाध्यक्ष दिलीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासद, कार्यकर्त्यांनी, विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संघटनांच्या सदस्य तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आदर्शांस श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती बौद्धजन सेवा संघ नायशी गाव व मुंबई शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात केली आहे.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?