कोथरुड सोसायटी व ढोल पथक लीग सुंदर गार्डन सोसायटी विजेती; कोथरूड विधानसभा मतदारसंघ 30 संघ सहभागी

0

कोथरूड सोसायटी अन ढोल ताशा पथक लीग असे सुमारे 30 संघ आमने-सामने…… राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते यांचेही संघ त्यातच स्थानिक पत्रकारांचाही संघ. कोथरूड भागामध्ये अशा पद्धतीने प्रथमताच अत्यंत जिकरीच्या दोन दिवसीय स्पर्धाचे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निष्ठावान शिवसैनिक विभाग संघटक उमेश उत्तम भेलके यांच्या मार्गदर्शनात संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ, ट्रस्टतर्फे सुवर्ण महोत्सवी ५०वे वर्षानिमित्त मंडळाचे संस्थापक, मा. नगरसेवक स्व. उत्तमकाका भेलके यांच्या जयंती निमित्त आयोजन करण्यात आले होते. सोसायटी व ढोल ताशा पथक आणि राजकीय पत्रकार सामाजिक अशा तिहेरी स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या चुरशीच्या स्पर्धेमध्ये सुंदर गार्डन सोसायटी प्रथम क्रमांक पटकावत चषकाची मानकरी ठरली.

कोथरूड भागातील स्व. माजी नगरसेवक उत्तम काका भेलके यांच्यामार्फत संपूर्ण कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सोसायटींसाठी बॉक्स क्रिकेट लीग करंडक आयोजित करण्यात आल्यानंतर या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्साही प्रतिसाद लाभत गेला. त्यातच पुणे शहरात सर्वात प्रथमच ढोल ताशा पथकांची क्रिकेट लीग ही एक वेगळी संकल्पना पुणे शहरांमध्ये सुरू झाल्यामुळे संपूर्ण पुणे शहरात या अनोख्या स्पर्धेची चर्चा सुरू होती. विभिन्न विभागामध्ये स्पर्धा घेतल्या जात असल्या तरी सुद्धा राजकीय आणि सामाजिक स्तरावरील कट्टे यांचीही दखल घेत कोथरूड भागातील नामांकित दोन शितल कट्टा व स्वीकार कट्टा या दोन कट्ट्यांमध्येही चुरशीचा सामना रंगला त्यामध्ये स्वीकार कट्ट्या विजेता झाला. या स्पर्धेबरोबरच सर्व पत्रकार मित्र आणि राजकीय नेते अशा प्रेक्षणीय सामन्यांचे आयोजनही करण्यात आले होते.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

कोथरूड भागामध्ये प्रथमच ढोल ताशा पथक आणि सोसायटी एकत्रित खेळवण्यात आलेल्या अभिनव उप्रकमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना पुणेशहर प्रमुख गजानन थरकुडे, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष माजी नगरसेवक श्याम देशपांडे, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहराध्यक्ष ॲड. मंदार जोशी, प्रभाकर(अण्णा) मोहोळ, माजी नगरसेवक जयंत भावे, भाजपा कोथरूड विधानसभा समन्वयक नवनाथ जाधव, माजी नगरसेवक अँड. योगेश मोकाटे, पुणे महापालिका शिक्षण मंडळ माजी सदस्य राम बोरकर, आद्यक्रांतिगुरु लोकशाहीर आण्णाभाऊ साठे समिती मा.अध्यक्ष विजय डाकले, पुणे शहर भाजपा युवा मोर्चाचे दुष्यंत मोहोळ, कोथरूड राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष गिरीश गुरुनानी, संदीप मोकाटे, जयदीप पडवळ, गोविंद थरकुडे, विनोद मोहिते नितीन शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सुधीर धावडे, किरण उभे, नंदकुमार गोसावी, अनिल बिडलान, अमोल डांगे, अनिरुद्ध खांडेकर, गजानन मांझीरे, अजय भुवड, किशोर मारणे, चेतन भालेकर, संतोष लांडे, गणेश काकडे, सचिन विप्र, विशाल भेलके, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप, वैभव जमदाडे, संतोष गावडे, सागर भेलके यांच्यासह असंख्य प्रतिष्ठित मान्यवरांनी या स्पर्धेमध्ये शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थिती लावली.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

कोथरुड सोसायटी व ढोल पथक लीग या मुख्य स्पर्धात्मक प्रकारामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघातील निवडक 10 सोसायटीच्या संघांनाच स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आला तर संपूर्ण पुणे शहरातील 16 ढोल ताशा पथकं सहभागी झाली होती. प्रेक्षणीय सामन्यांमध्ये सुमारे 4 राजकिय/सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या लढती प्रेक्षणीय झाल्या. या अत्यटतीच्या सामन्यामध्ये सुंदर गार्डन सोसायटीने प्रथम क्रमांक ( २५,०००/-) पटकावला तर रमणबाग पथक अटीतटीच्या लढतीमध्ये द्वितीय क्रमांकाची (११,०००/-) मानकरी ठरली. उपांत्य सामन्यामध्ये राजमुद्रा पथक यांना  तृतीय क्रमांक (७,०००/-) तर एकमत सोसायटी यांना चतुर्थ क्रमांक ५,०००/- मिळाला.