CID ने चेल्याचे अखेर तोंड उघडलं, मोठा पुरावा हाती!वाल्मिकची आता सुटका नाही?; सूत्रांचा माहितीस दूजोरा

0

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. वाल्मिक कराडसह ९ आरोपी हे तुरुंगात आहे. तर अवादा कंपनी खंडणी प्रकरणी प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचं आता निष्पन्न झालं आहे. त्यामुळे कराडसह इतर आरोपींच्या पाय आणखी खोलात गेला आहे.

विशेष म्हणजे वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून ही खंडणी मागितल्याच्या संदर्भात देखील काही महत्वाचे पुरावे सीआयडीच्या हाती लागल्याची शक्याता वर्तवली जात आहे.. यासंदर्भात सीआयडीने अधिकृत सांगितले नसले तरी सूत्रांनी दूजोरा दिला आहे. हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेची तीन दिवसाची सीआयडी कोठडी ही अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. याच तपासातून खंडणी प्रकरणाचे सत्य समोर येणार का पाहणं महत्वाचं असेल.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

चौकशीचे ३ दिवस ठरले गेमचेंजर

सुदर्शन घुलेची तीन दिवस सीआयडीने कसून चौकशी केली

– आवाजाचे नमुनेही घेतले.

– वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून खंडणी मागितली का? याचीही चौकशी

– खंडणी कुठे कशी आणि किती मागितली.. याबाबतीतही विचारणा

– यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचीही चौकशी

– तर अवादा कंपनीकडे खंडणी मागतानाचा घटनाक्रम याचीही पडताळणी

– अशा प्रमुख मुद्द्यावर सुदर्शन होण्याची चौकशी