भाजपाची महापालिकेची तयारी सुरू?; प्रभाग 12 बांधणी मनसैनिक चंद्रकांतदादांच्या उपस्थितीत झाला भाजपावाशी

0

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांची प्रचंड पाठबळ असतानाही योग्य ध्येय धोरणे नसल्या कारणामुळे कार्यकर्त्यांच्या पदरी पडत असलेल्या निराशेला कंटाळून मनसे विध्यार्थी सेना कोथरूडचे माजी उपाध्यक्ष रौनक रमेश कारेकर यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत आज भाजपामध्ये प्रवेश केला.

आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये एक नवी कार्यकर्त्यांची फळी तयार होत आहे आणि त्याच फळीमध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत असतांनाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा मनसैनिक भाजपवासी झाल्यामुळे प्रभाग 12 मधील स्थानिक गणिते बदलण्यास मदत होणार आहे. यावेळी भाजपा नेते नवनाथ भाऊ जाधव, नगरसेविका वासंतीताई जाधव, नगरसेविका हर्षलीताई माथवड, कोथरूड विभाग अध्यक्ष पुनीतजी जोशी, कोथरूड दक्षिण भाजपा अध्यक्ष डॉ. संदीपजी बुटाला, विठ्ठलअण्णा बराटे तसेच भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव अभिजित राऊत उपस्थित होते.

अधिक वाचा  काँग्रेसमधील बड्या नेत्याचा अजितदादांना फोन; या महापालिकेत एकत्र लढायचं का? कार्यकर्त्यांनी 238 मतदारसंघात… दादांचं हे मत

कोथरूड मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी कार्यकर्त्यांसाठी संघटन हीच शक्ती हे ब्रीदवाक्य दिले असून असून भारतीय जनता पक्षाच्या विचारधारे प्रमाणे प्रथम राष्ट्र सेवा याच उद्देशाने कार्यशिल राहणार असे रौनक कारेकर यावेळी म्हणाले.