‘महाविकास आघाडी हाय हाय; उद्धव ठाकरे तुम्ही केलं काय?’ आठवलेंचा नवा नारा

0
4

विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नाशिकमध्ये बोलताना महायुतीचे नेते रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच कवितेमधून केली. ‘वाढवायची आहे आपल्याला महाराष्ट्राची शान, साऱ्या देशाचे आहे नरेंद्र मोदींकडे ध्यान, महाराष्ट्रात सुटलाय महायुतीचा वारा, नरेंद्र मोदींसाठी जमलाय जनसमुदाय सारा, देऊया भारत मातेचा नारा आणि वाजवूया मविआचे बारा.’ असं म्हणत त्यांनी यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला.

नेमकं काय म्हणाले आठवले?

विकास, विकास आणि विकास हाच मोदींच्या जीवनाचा टप्पा आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी नितीन गडकरी यांना रस्ते विभाग दिला. आज अनेक ठिकाणी चांगले रस्ते झाले आहेत. स्टेशन आणि रेल्वेची कनेक्टिविटी चांगली झाली आहे. शेतकऱ्यांना मदत होत आहे. लोकांना धान्य देण्यात येत आहे. २५ कोटी लोकं १० वर्षांमध्ये गरीबी रेषेच्यावर आले आहेत. आपली आर्थिक स्थिती चांगली आहे. आपण पुढील ५ वर्षांमध्ये नंबर तीनची अर्थव्यवस्था बनणार आहोत. त्यापुढचे पाच वर्ष आम्हाला मिळाले तर आपण नंबर दोनची अर्थव्यवस्था होऊ, त्यानंतर जर सत्ता आली तर जगात भारत एक नंबरची अर्थव्यवस्था असेल असं आठवले यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘महाविकास आघाडीवाले म्हणतात की देशाची प्रगती नाही. उद्धव जी आपण केलं काय, महाविकास आघाडी हाय हाय, उद्धवजी आपण केलं काय? घरात बसा, काही हरकत नाही. बाळासाहेब मला म्हणाले होते शिवशक्ती भीमशक्ती सोबत आली पाहिजे. मी ज्याचासोबत जातो त्यांचा विजय होतो, ज्यांच्याविरोधात जातो त्यांचा सत्यनाश होतो. उद्धवजी म्हणाले मी तिकडे जातो, मी म्हणालो जा, पण धनुष्यबाण इकडे येणार आहे,’ असंही आठवले यांनी यावेळी म्हटलं.

पवार साहेबांना म्हणालो मी इकडे आलो तर तुम्ही तिकडे काय करत आहात? सोनिया गांधींनी पवारांना पंतप्रधान बनवलं नाही, पवारांवर अन्याय केला. आपण लोकसभेत विरोधीपक्षनेते असताना आम्ही आपल्यासोबत होतो. तेव्हा सोनिया गांधींना बोललो की त्यांना संधी द्या. पण तसं काही झालं नाही. आम्ही आपल्याला सांगत होतो इकडे या. राहुल गांधी याद राखा जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी आठवले यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या!