राज ठाकरे बाहेर पडले, पण त्यांनी पक्ष फोडला नाही, मनसे नेत्याचे भुजबळांवर टीकास्त्र

0

राज ठाकरे बाहेर पडले मात्र त्यांनी पक्ष फोडला नाही. बाळासाहेबांना सांगून ते बाहेर पडले. भुजबळ राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलत राहिले. भुजबळ स्वतःचा इतिहास विसरत आहेत शरद पवारांच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे भुजबळ आहेत, अशा शब्दांत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज्याच्या राजकारणात कायम चर्चेत असलेले नेते छगन भुजबळ यांनी टीव्ही९ मराठीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंना सवाल केले होते. घरातील सदस्य असलेल्या राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली? त्यावेळी काय मागण्या केल्या होत्या? हे त्यांनीच समोर येऊन सांगावं अस भुजबळ म्हणाले होते. त्यांच्या याच विधानाचा दाखला देत प्रकाश महाजन यांनी भुजबळ यांना खडेबोल सुनावले आहेत. भुजबळांना सत्तेचा मोह खूप आहे सत्ता मिळत नाही म्हणून त्या गोष्टीची मळमळ बाहेर येत आहे, अशी टीकाही महाजन यांनी केली.

अधिक वाचा  पुण्यात रात्रीत सर्वात मोठी घडामोड; पवारांची बिन आवाजाची काठी चालली अन् ‘देवाभाऊं’चे मनसुबे उधळले

काय म्हणाले प्रकाश महाजन ?

छगन भुजबळ यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंवरही टीका केली होती. मात्र त्यांची ही टीका मनसे नेत्यांना रुचली नसून प्रकाश महाजन यांनी भुजबळ यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘ छगन भुजबळ राज ठाकरे यांच्या वरती का घसरले हे मला कळाले नाही. भुजबळ यांना मानसिक त्रास झालेला आहे. लोकसभेला नाशिक लढवणार म्हणून चर्चा होती पण ते काही झालं नाही. त्यानंतर त्यांना राज्यसभेवरती घेणार होते, तेही झालं नाही. ज्यावेळेस भुजबळांना एखादी गोष्ट मिळत नाही, त्या गोष्टीला तात्विक मुलामा देण्याचं काम करत आहेत. खरं म्हणजे भुजबळाने नाशिकमध्ये नॉलेज सिटी काढली भुजबळांचं एवढं नॉलेज कमी कसं ?’ असा सवाल महाजन यांनी विचारला.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

भुजबळ 93 साली 18 आमदार घेऊन बाहेर पडले ,कशामुळे पडले, मंडल आयोगामुळे पडले हे सर्व खोटं आहे. मनोहर जोशींना विरोधी पक्षनेता केल म्हणून त्या रागापोटी ते बाहेर पडले. राज ठाकरे बाहेर पडले मात्र त्यांनी पक्ष फोडला नाही. बाळासाहेबांना सांगून ते बाहेर पडले. बाळासाहेबांचा वयाचा मर्यादा न ठेवता अटक कोणी केली ? प्रत्येकाला वैयक्तिक प्रगती करण्याचा अधिकार आहे. राज ठाकरे कशामुळे बाहेर पडले ते भुजबळांना काय माहिती ? भुजबळ हे राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलत राहिले. रक्ताचं नातं तुटत असतं का ? ही वैचारिक भिन्नता आहे. विचार पटले नाही, राज साहेबांना वाटले इथे प्रगती होऊ शकत नाही ,काही गोष्टी मतभेद झाले असतील. भुजबळ स्वतःचा इतिहास विसरत आहेत शरद पवारांच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे भुजबळ आहेत, अशी टीका महाजन यांनी केली. वैफल्यग्रस्त भुजबळ टीका करत आहेत. भुजबळांना सत्तेचा मोह खूप आहे, सत्ता मिळत नाही म्हणून त्या गोष्टीची मळमळ बाहेर येते, असे टीकास्त्रही महाजन यांनी सोडलं.

अधिक वाचा  राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकांसाठी या नेत्यांची विभागनिहाय ‘निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती जबाबदारी दिलेल्या नेत्यांची नावे जाहीर; सविस्तर वाचा!

छगन भुजबळ यांचा राज ठाकरेंना सवाल

माझ्याबद्दल बोलता मग राज ठाकरे शाळेत असताना, ते लवकर आले नाहीत तर मासाहेब आणि बाळासाहेब ठाकरे जेवत नव्हते. तुमचं रक्ताचं नाते आहे ना, तुमचे मतभेद कशावरून झाले, झाले तरी तेव्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती. तुमचे मतभेद काय होते, तुमची मागणी काय होती, सांगा लोकांना, मतभेद असले तरी सांभाळून घ्यायला नको का असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना सोडून चूक केल्याचं भुजबळ म्हणाले होते.