ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक रायफल वापरण्यास बंदी! मुंबईतल्या घटनेमुळं रेल्वेचा निर्णय

0

मुंबई : जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये आरपीएफच्या जवानानं चार जणांची गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेनंतर रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. आता ट्रेनमध्ये आरपीएफच्या जवानांना ऑटोमॅटिक रायफल वापरण्यास बंदी घोलण्यात आली आहे.

रेल्वेच्या सुत्रांच्या माहितीनुसार, RPFच्या एस्कॉर्ट पार्टीला मुंबई विभागात एक्सप्रेस ट्रेनमध्ये स्वयंचलित हत्यारं न वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वयंचलित रायफल ऐवजी पिस्तूल वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

३१ जुलैला जयपूर एक्सप्रेसमध्ये RPF जवानानं केलेल्या गोळीबारात चौघांचा मृत्यू झाला होता. चेतन सिंह नामक आरपीएफच्या कॉन्स्टेबलनं आपल्या जवळील AR-M१ रायफलनं आपल्या वरिष्ठाला गोळ्या घातल्या त्यानंतर त्यानं इतर तीन प्रवाशांवरही गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात या चौघांचा जागीच मृत्यू झाला.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा