भाजपच्या तब्बल 13 मंत्र्यांना कर्नाटकमध्ये जनतेने घरी पाठवलं, ‘त्या’ मंत्र्यांची यादी पाहा

0

मुंबई : मेरा देश महान, असं आपण उगाच म्हणत नाहीत. कारण भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. देशाची जनता एखादी गोष्ट जितकं उचलून डोक्यावर धरते, अगदी तसंच डोक्यावर घेतलेली गोष्ट डोईजड झाली किंवा त्याचा चुकीचा पायंडा पडला, नको ती समस्या निर्माण झाली तर ती गोष्ट डोक्यावरुन खाली आपटून, तिचा नायनाट करायलाही जनता मागेपुढे पाहत नाही. भारताच्या लोकशाहीने हे वारंवार दाखवून दिलंय. 1977 च्या आणीबाणीनंतर दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सरकार पडलं होतं. पण त्यानंतर पुढच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा इंदिरा गांधी यांचं सरकार सत्तेत आलं होतं.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

देशातल्या राजकारणात सध्या घोडेबाजाराच्या घटना समोर येताना दिसतात. पण त्याला जनतेकडून मतदानातून उत्तर देण्यात येताना दिसत आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतही तेच बघायला मिळतंय. कर्नाटकातल्या जनतेने तब्बल 13 मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. विशेष म्हणजे हे मंत्री फार साधेसुधी माणसं नाहीत तर मुरलेले राजकारणी आहेत. पण अशा मातब्बर राजकारण्यांना जनेतेने थेट घरी पाठवलं आहे. यातून लोकशाही किती ताकदवान आहे याचं जीवंत उदाहरण उभं राहिलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा अतिशय दारूण पराभव झालाय. हा पराभव भाजपच्या अतिशय जिव्हारी लागले इतका भयानक निकाल आहे. भाजपने कर्नाटकमधील 31 पैकी 25 मंत्र्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. पण त्यापैकी तब्बल 13 मंत्र्यांचा पराभव झाला आहे. हा भाजपसाठी सर्वात मोठा झटका मानला जातोय. विशेष म्हणजे जलसंधारण, परिवहन, लघू-मध्य उद्योग, आरोग्य, नगर प्रशासन, युवाविकास, महिला बालकिवास, वस्त्रोद्योग, शालेय शिक्षण, फलोत्पादन अशा विभागाच्या मंत्र्यांना जनतेने थेट घरचा रस्ता दाखवला आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

कर्नाटकात कोणकोणत्या मंत्र्यांचा पराभव?

1) कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य मंत्री – के सुधाकर

2) परिवहन विभाग आणि आदिवासी विकास मंत्री – बल्लारी श्रीरामुलू

3) महिला आणि बालविकास मंत्री – हलप्पा अचार

4) जलसंपदा मंत्री – गोविंद कराजोल

5) गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास विभाग मंत्री – वीरण्णा सोमन्ना

6) महसूल मंत्री – आर अशोक (आर अशोक यांचा कानाकापुरा येथे डी के शिवकुमार यांनी पराभव केलाय. पण बंगळुरुत त्यांचा विजय झालाय.)

7) क्रीडा मंत्री – नारायणगौडा

8) लघू-मध्य उद्योग मंत्री – एम.टी.बी. नागराज

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

9) कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री – मधुस्वामी

10) शालेय शिक्षण मंत्री – बी.सी. नागेश

11) उद्योग मंत्री – मुरुगेश निरानी

12) वस्त्रोद्योगमंत्री – शंकर पाटील मुनेनाकोप्पा

13) कृषीमंत्री – बी. सी. पाटील.